गंगापुरात दर्पण दिनानिमित्त दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन
गंगापूर, (प्रतिनिधी) : पत्रकारांनी निर्भीडपणे जनतेच्या समस्या मांडल्याच पाहिजे पत्रकारांच्या लेखणी मुळे सर्वसामान्यांना न्याय मिळतो असे प्रतिपादन पोलीस निरीक्षक कुमारसिंग राठोड यांनी केले. कोणत्याही पत्रकारावर अन्याय झाल्यास अन्याय करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. त्यांच्या विरोधात नवीन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक कुमारसिंग राठोड यांनी सांगितले.
भारतीय बहुद्देशिय पत्रकार संघ कार्यालय येथे दर्पण दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी पोलिस निरीक्षक कुमारसिंग राठोड बोलत होते. मंगळवारी
(दि. ६) रोजी दर्पण दिन व मराठी पत्रकार दिनाच्या औचित्याने गंगापूर येथे भारतीय बहुउद्देशीय पत्रकार संघाच्या वतीने मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रम गंगापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कुमारसिंग राठोड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.
यावेळी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना आयुब पटेल यांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या मराठी पत्रकारितेतील अमूल्य योगदानाची माहिती दिली. दर्पण दिन साजरा करण्यामागील ऐतिहासिक भूमिका स्पष्ट केली. पोलीस निरीक्षक राठोड यांनी पुढे सांगितले की, पत्रकारांच्या लेखणी मुळे सर्वसामान्यांना न्याय मिळतो.
यावेळी बहुद्देशीय पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष विजय बन्सोड, रमाकांत बन्सोड, अय्युब पटेल, राजेंद्र सरोवर, अलिम चाऊस, बाळासाहेब वाघमारे, इब्राहिम शेख, सामाजिक कार्यकर्तुता अतुल रासकर, गिरीष गंगापूरकर, अमर बाशवान, राजेंद्र जाधव, विशाल जोशी, लक्ष्मीकांत माघाडे, सुनील झिंजुर्डे, गणेश म्हैसमाळे, अमोल पारखे, अमोल आळंजकर, चंद्रकांत जाधव, पोलीस कॉन्स्टेबल भागवत खाडे, द्वारकानाथ भनगडे, नागेबाबा पतसंस्थेचे नितीन गारुडे, दीपक दंडगव्हाळ, मोहन औटे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लक्ष्मीकांत माघाडे यांनी केले तर आभार प्रदर्शन विशाल जोशी यांनी केले.